महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री
दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र !!!
नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह
अनेक ठिकाणी
हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या
व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची
मनोभावे आराधना केली जाते. आज अनेक
राज्यांत याला उत्सवाचे स्वरूपही आले आहे.
रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या
उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत
करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर
रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार
मारले.
महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते
नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला
रात्री महिषासुराला ठार मारले. तेव्हापासून तिला
महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.