Total Pageviews

Wednesday 30 July 2014

का करतात श्रावण महिन्यात महादेवाची पुजा ?

का करतात श्रावण महिन्यात महादेवाची पूजा? देवांचा देव म्हणजे महादेव. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ठ पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना असे सांगितले आहे. या संबंधातील एका गोष्टीनुसार जेव्हा सनत राजकुमारांनी महादेवाला विचारले की, श्रावण महिना आपल्याला का प्रिय आहे तेंव्हा महादेव म्हणाले की देवी सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला. यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात.

No comments:

Post a Comment