Total Pageviews

Saturday 9 August 2014

राखी पौर्णिमा

राखी पौर्णिमा : श्रावण पौर्णिमा याच दिवशी हा सण साजरा केला जातो. बहिणीने भावाला उजव्या हाताला रेशमी गोफ हे प्रेमाचे प्रतीक बांधून, नाते पक्के करण्याची ही पद्धत आहे. भावाच्या हाताला राखी बांधून, बहीण आपल्या रक्षणाची जबाबदारी भावाकडे सोपवते, नात्याचा बंध अधिक दृढ करते. ज्यांना भाऊ किंवा बहीण नाही, ते ही नाती प्रेमाने निर्माण करतात. मानवी नात्यांच्या माध्यमातून अशा विशिष्ट दिवशी एकत्र येणे, आनंदाचा अनुभव घेणे या निमित्ताने घडते.

No comments:

Post a Comment