आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी
किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या
घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला
केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि
दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात
येतो.
महाराष्ट्रात हा सण दसरा म्हणूनही साजरा केला
जातो. परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची
पाने देतात.या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन
अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते.
सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून
जायचे,शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे,तेथे
अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची
स्थापना करावयाची तीला प्रार्थना करावयाची
कि मला विजयी कर.त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र
पूजन,व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व
विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी
प्रथा आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे या दिवशी
साधारणतः श्रवण नक्षत्र राहते.
* पौराणिक दाखले
१. श्रीरामाने या दिवशी रावणाचा वध केला.
२. पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले.